झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसामचे डीएसपी संदीपन यांना अटक

झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात आसाम पोलिसांचे डीएसपी संदीपन गर्ग यांना बुधवारी अटक करण्यात आली. संदीपन गर्ग हे झुबीन गर्ग यांचे चुलत भाऊ आहेत. अपघाताच्या वेळी ते सिंगापूरमध्ये गायकासोबत होते. संदीपन यांच्या अटकेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसामचे डीएसपी संदीपन यांना अटक
झुबीन गर्ग मृत्यूप्रकरणी आसामचे डीएसपी संदीपन यांना अटक
Published on

गुवाहाटी : झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणात आसाम पोलिसांचे डीएसपी संदीपन गर्ग यांना बुधवारी अटक करण्यात आली. संदीपन गर्ग हे झुबीन गर्ग यांचे चुलत भाऊ आहेत. अपघाताच्या वेळी ते सिंगापूरमध्ये गायकासोबत होते. संदीपन यांच्या अटकेचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

या प्रकरणातील ही पाचवी अटक आहे. यापूर्वी, ईशान्य भारत महोत्सवाचे मुख्य आयोजक श्यामकानू महंत, गायकाचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि त्यांच्या बँडचे दोन सदस्य शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृत प्रभा महंत यांना अटक करण्यात आली होती.

झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना अपघाती निधन झाले. झुबीन हे २० सप्टेंबर रोजी झालेल्या ‘नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हल’साठी सिंगापूरमध्ये असताना त्यांनी एका वॉटर अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये भाग घेतला होता.

logo
marathi.freepressjournal.in