आसामच्या महिला अधिकाऱ्याकडे २ कोटींचा ऐवज

आसाम सिव्हील सेवेतील अधिकारी नुपूर बोरा यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. बोरा यांच्या गुवाहाटी येथील घरावर विशेष दक्षता विभागाने छापेमारी केली. या छाप्यात ९२ लाख रोख व २ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले, तर ...
आसामच्या महिला अधिकाऱ्याकडे २ कोटींचा ऐवज
Photo : X (@revathitweets)
Published on

दिसपूर : आसाम सिव्हील सेवेतील अधिकारी नुपूर बोरा यांना उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे. बोरा यांच्या गुवाहाटी येथील घरावर विशेष दक्षता विभागाने छापेमारी केली. या छाप्यात ९२ लाख रोख व २ कोटींचे दागिने जप्त करण्यात आले, तर बारपेटा येथील एका भाड्याच्या घरावर दुसऱ्या पथकाने छापेमारी केली, तेथे १० लाख रुपये रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.

बारपेटा महसूल विभागात काम करताना नुपूर यांनी हिंदूंची जमीन संदिग्ध व्यक्तीच्या नावे केली. यासाठी त्यांनी पैसे घेतले, असा त्यांच्यावर आरोप आहे. नुपूर सध्या कामरूप येथील गोरोइमारी येथे प्रांत अधिकारी म्हणून काम करत आहेत.

मुख्यमंत्री हिमंत बिश्व सर्मा यांनी सांगितले की, वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाबाबत तक्रार मिळाल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in