बस अपघातात 12 जणांचा मृत्यू

डेरगावात मोठा अपघात, ट्रकची बसला जोरदार धडक
बस अपघातात 12 जणांचा मृत्यू

आसाममधील डेरगाव येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण गंभीर जखमी झाले. 45 जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ट्रक धडकल्याने हा अपघात झाला. हि बस तीनसुकियातील तिलिंगा मंदिरात पिकनिक पार्टीसाठी प्रवाश्यांना घेऊन जात होती. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कोळशाने भरलेल्या ट्रकने या बसला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये प्रवास करणारे लोकं 3 वाजता पिकनिक पार्टीसाठी निघाले होते. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले, तर किमान 12 जणांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना जोरहाट मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत, मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाच्या पुढील तपास करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in