ॲस्ट्राझेनेका ‘कोविड-१९ लस’ मागे घेणार

ॲस्ट्राझेनेका या ब्रिटनस्थित औषध कंपनीने त्यांची ‘कोविड-१९ लस’ जागतिक स्तरावर बाजारातून मागे घेण्यास सुरुवात केली आहे.
ॲस्ट्राझेनेका ‘कोविड-१९ लस’ मागे घेणार

नवी दिल्ली : ॲस्ट्राझेनेका या ब्रिटनस्थित औषध कंपनीने त्यांची ‘कोविड-१९ लस’ जागतिक स्तरावर बाजारातून मागे घेण्यास सुरुवात केली आहे. ही लस भारतामध्ये 'कोविशिल्ड' नावाने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या भागीदारीत उपलब्ध करण्यात आली होती. ॲस्ट्राझेनेकाने या लसीचे काही दुष्परिणाम असल्याचे मान्य केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ॲस्ट्राझेनेका कंपनीने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या बाजारात कोव्हिडच्या अधिक अद्ययावत लशींची मोठ्या प्रमाणावर उपलब्धता असल्याने हा निर्णय घेण्यात येत आहे. अॅस्ट्राझेनेका ने ‘कोव्हिड-१९ लस’ विकसित करण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी भागीदारी केली होती.

ही लस भारतात कोव्हिशिल्ड आणि व्हॅक्सझेर्व्हरिया म्हणून युरोपमध्ये विकली गेली. भारतात कोव्हिड-१९ लसींचे २२० कोटींपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत आणि त्यापैकी बहुतांश कोविशिल्ड होते. ॲस्ट्राझेनेकाने कबूल केले होते की, त्यांच्या लसीमध्ये अत्यंत दुर्मिळ प्रकरणांमध्ये ‘थ्रोम्बोसिस विथ थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम’ (टीटीएस) नावाचा दुर्मिळ दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘साइड इफेक्ट्स’चा संदर्भ न घेता कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा अंत करण्यासाठी व्हॅक्सझेर्व्हरियाने बजावलेल्या भूमिकेचा आम्हाला अभिमान आहे. साथीच्या पहिल्या वर्षात या लसीने ६.५ दशलक्षाहून अधिक जीव वाचवले गेले. आमच्या प्रयत्नांना जगभरातील सरकारांनी मान्यता दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in