अंतराळवीर शुभांशू शुक्ला भारतात परतले; दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत, पंतप्रधानांना भेटणार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे रविवारी पहाटे अमेरिकेहून भारतात परतले. ते पत्नी कामना आणि मुलगा किआशसह दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. शुभांशू यांचे वडील शंभू दयाळ शुक्लादेखील त्यांच्यासोबत होते.
अंतराळवीर शुभांशू शुक्ला भारतात परतले; दिल्ली विमानतळावर जोरदार स्वागत, पंतप्रधानांना भेटणार
Photo : X (shubhanshufans_)
Published on

लखनौ : अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे रविवारी पहाटे अमेरिकेहून भारतात परतले. ते पत्नी कामना आणि मुलगा किआशसह दिल्ली विमानतळावर उतरले. यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी त्यांचे स्वागत केले. शुभांशू यांचे वडील शंभू दयाळ शुक्लादेखील त्यांच्यासोबत होते.

शुभांशू शुक्ला हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. त्यानंतर ते बंगळुरूला जातील. २३ ऑगस्टला ते ‘इस्रो’च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ दिनाच्या समारंभात सहभागी होतील. २५ ऑगस्टला ते लखनौतील आपल्या घरी येतील.

‘तो जगासाठी एक सेलिब्रिटी असू शकतो, पण माझ्यासाठी तो अजूनही माझा लहान मुलगा आहे. मी त्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे’, असे शुभांशूच्या आईने म्हटले आहे.

‘ऑक्सियम मिशन-४’अंतर्गत शुभांशू शुक्लासह चार अंतराळवीर २५ जूनला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी रवाना झाले होते. ते २६ जून रोजी भारतीय वेळेनुसार ४:०१ वाजता ‘आयएसएस’वर पोहोचले. १८ दिवस अंतराळ स्थानकात राहिल्यानंतर ते १५ जुलैला पृथ्वीवर परतले.

logo
marathi.freepressjournal.in