दिल्ली सेवा विधेयकाला समर्थ देताना आठवलेंनी सादर केली कविता, म्हणाले...

दिल्ली सेवा विधेयकाला समर्थ देताना आठवलेंनी सादर केली कविता, म्हणाले...

लोकसभेनंतर राज्यसभेतही हे विधेयक पारित झालं असून या विधेयकाच्या समर्थनार्थ १३१ तर विरोधात १०२ सदस्यांनी मतदान केलं.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मांडलेले 'दिल्ली सेवा विधेयक' लोकसभेत बहुमताने पारित केल्यानंतर आता ते राज्यसभेत मांडण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख रामदास आठवले यांनी संसदेत या विधेयकाच्या चर्चेत सहभाग घेत आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी रामदार आठवले यांनी आपल्या खास शैलीत या विधेयकाचं समर्थन केलं. यावेळी आठवले यांनी त्याच खास शैलीत विरोधकांवर टीका देखील केली. तर यावेळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतूक करायलाही चुकले नाहीत. त्यांनी कविता म्हणत या विधेयकाच्या बाजूने आपलं मत मांडलं.

दिल्लीच्या राजकारणातील वादाचं केंद्रबिंदू बनलेलं हे बिल लोकसभेनंतर राज्यसभेत देखील पारीत झालं आहे. या विधेयकावर मतदान घेताना राज्यसभेत बरीच चर्चा, गोंधळ पाहायला मिळाला. या विधेयकाच्या समर्थनार्थ १३१ तर विरोधात १०२ सदस्यांनी मतदान केलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या विधेयलकाला कविता करुन आपलं समर्थन दर्शवलं. यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाला टोला देखील लगावला.

आठवलेलींनी सादर केलेली कविता

अमित भाईका इतना अच्छा आ गया है बिल

लेकीन सामने वालो के हो रहा है फील

नरेंद्र मोदीजी के पास, बहुत अच्छी वील

लेकीन दिल्ली मे हो रही है दारु के ठेके की डील

नरेंद्र मोदी और अमित शाह की अच्छी जम गई जाडी

फिर काँग्रेस और आपवालों की कैसे आगे जाएगी गाडी

नरेंद्र मोदीजी जानते हे जनता की नाडी

इसलिए बडाई है. मैने अपनी दाढी

अशी कविता रामादास आठवलेंनी सादर केली. यावेळी सभागृहात एकच हशा पिकला. नरेंद्र मोदी बाबासाहेबांच संविधान बदलणारे नसून ते संविधानाची रक्षा करत आहेत. दिल्ली सेवा विधेयक हे भारताच्या संविधानाची रक्षा करणारे बिल आहे. यामुळे मी माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने या बिलाचं समर्थन करतो आणि विरोधकांनी देखील या विधेयकाचं समर्थन केलं पाहीजे, असं आठवले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in