गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची धारच बोथट झाली ?

बैठक प्रदीर्घ काळ चालली आणि गृहमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे कान देऊन ऐकले. मात्र, अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असे कुस्तीपटूंच्या जवळच्या स्रोताकडून समजते
गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची धारच बोथट झाली ?
Published on

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर भारतीय कुस्तीपटू संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू रेल्वेतील आपापल्या कामावर परतले आहेत. तपास यंत्रणा आपले काम चोखपणे बजावत आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा, असे गृहमंत्री अमित शहा यांनी कुस्तीपटूंना आश्वस्त केले. त्यानंतर बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट हे आंदोलनकर्ते कुस्तीपटू रेल्वेतील आपापल्या कामावर रूजू झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, आंदोलनातून माघार घेतली नसून आमचा लढा सुरूच राहील, असे कुस्तीपटूंनी सांगितले आहे.

अमित शहांशी भेटीदरम्यान कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण सिंह यांच्या निषेधसंदर्भातील विविध मुद्यांवर त्यांनी चर्चा केली. कुस्तीपटूंनी आपली व्यथा गृहमंत्र्यांसमोर मांडली. ही बैठक प्रदीर्घ काळ चालली आणि गृहमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे कान देऊन ऐकले. मात्र, अजूनपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही, असे कुस्तीपटूंच्या जवळच्या स्रोताकडून समजते. बजरंग, साक्षी आणि विनेश हे कुस्तीपटू एप्रिलपासून सुरू झालेल्या निषेध आंदोलनात आघाडीवर होते. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे.

निषेधासाठी जंतरमंतरवर ठिय्या मारून बसलेल्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत मैदानावरून हुसकावले होते. त्यानंतर कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत बुडवण्याची धमकी दिली होती. मात्र, किसान नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता आणि पदके गंगेऐवजी किसान नेत्यांच्या हाती सुपूर्द केली होती. आता गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची धारच बोथट झाली आहे. निषेधासाठी जंतरमंतरवर ठिय्या मारून बसलेल्या कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत मैदानावरून हुसकावले होते. त्यानंतर कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेत बुडवण्याची धमकी दिली होती. मात्र, किसान नेत्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेतला होता आणि पदके गंगेऐवजी किसान नेत्यांच्या हाती सुपूर्द केली होती. आता गृहमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलनाची धारच बोथट झाली आहे.

उत्तर रेल्वे मुख्यालयातील नोंदी आणि अहवालानुसार रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती साक्षी मलिकने ३१ मेपासून बरोडा हाऊस कार्यालयात हजेरी लावली आहे. पदके गंगेत बुडवण्यापासून परावृत्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी साक्षीने कार्यालयात हजेरी लावली. साक्षीने सोमवारी या वृत्तास दुजोरा दिला आहे. मात्र, आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त तिने फेटाळून लावले आहे. ते वृत्त पूर्णपणे चुकीचे असून, आपल्यापैकी कोणीही आंदोलनातून माघार घेतली नसल्याचे तिने सांगितले. न्यायासाठीचा आमचा लढा असाच सुरू ठेवू, पण त्याचवेळी रेल्वेतील आमची जबाबदारी देखील सांभाळू, असे साक्षीने निक्षून सांगितले. त्याआधी बजरंग, साक्षी आणि विनेश यांनी अमित शहा यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली.

logo
marathi.freepressjournal.in