मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आतिशी यांनी स्वीकारली

प्रभू श्रीरामचंद्र वनवासात गेले तेव्हा भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला होता, असे उदाहरण देत ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी सोमवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आतिशी यांनी स्वीकारली
PTI
Published on

नवी दिल्ली : प्रभू श्रीरामचंद्र वनवासात गेले तेव्हा भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला होता, असे उदाहरण देत ‘आप’च्या नेत्या आतिशी यांनी सोमवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या आसनाचा वापर करीत होते, ते आसन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातच रिक्त ठेवून त्या आसनाशेजारी पांढऱ्या रंगाचे आसन ठेवून आतिशी त्यावर बसल्या.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या पदाचा हा अपमान असल्याची टीका दिल्ली भाजपचे प्रमुख वीरेंद्र सचदेव यांनी केली आहे. केजरीवाल सरकारमध्ये आतिशी यांच्याकडे शिक्षण, महसूल, अर्थ, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम यासह १३ खात्यांचा कारभार होता, ती खाती आतिशी यांनी स्वत:कडेच ठेवली आहेत. प्रभू रामचंद्रांच्या पादुका ज्याप्रमाणे भरताने सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला, त्याप्रमाणे आपण चार महिन्यांसाठी मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहोत. केजरीवाल यांनी राजीनामा देऊन पदाची प्रतिष्ठा राखली आहे. त्यांची प्रतिमा मलिन करण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही, असेही त्या म्हणाल्या.

logo
marathi.freepressjournal.in