ओवैसींच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी हल्ला ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

याआधी सुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झाली होती. त्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ओवैसीने या बद्दल टि्वटही केलं होतं.
ओवैसींच्या दिल्लीतील सरकारी निवासस्थानी हल्ला ; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

AIMIMचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या घरावर दगडफेक झाल्याची बातमी समोर आली आहे. राजधानी दिल्लीमध्ये अशोका रोडवरील असदुद्दीन ओवैसी यांच्या सरकारी बंगल्यात रविवारी फुटलेल्या काचा मिळाल्या. त्यानंतर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घराच्या केअरटेकरने पोलिसांना फोन करुन झालेला प्रकार सांगून तक्रार नोंदवली. आता पोलिसांकडून या प्रकरणात तपास सुरु आहे. मिळालेल्या माहितानुसार, रविवारी दुपारी 3.30 वाजता असदुद्दीन ओवैसींच्या सरकारी बंगल्यातून पोलीस ठाण्यात फोन आला होता.

यावेळी घराचे दरवाजे तुटलेले असून तिथे दगड पडलेले आहेत, अशी तक्रार करण्यात आली. फोन झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून लगेच तपास सुरु केला. दरवाजाच्या काचा फुटलेल्या होत्या. सरकारी घरात ज्या भागात तोडफोड झाली होती, तो भाग कॉर्डन ऑफ करण्यात आलाय. असदुद्दीन ओवैसींच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आता ओवैसींच्या घराबाहेर पीसीआर उभी केलीय. ही घटना जेव्हा घडली, त्यावेळी असदुद्दीन ओवैसी आपल्या दिल्लीतील घरी नव्हते.

असदुद्दीन ओवैसी हैदराबादमधून खासदार आहेत. याआधी सुद्धा त्यांच्या घरावर दगडफेक झाली होती. त्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ओवैसीने या बद्दल टि्वटही केलं होतं. 2014 नंतर अशा प्रकारच्या चार घटना झाल्या आहेत. असदुद्दीन ओवैसी हे कोणत्यान कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असतात. नुकतेच संसदेचं मान्सून सत्र संपलं. अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान असदुद्दीन ओवैसी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in