रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न

पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न
Published on

युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पुतिन यांच्या लिमोझिन कारवर बॉम्बने हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. रशियन अध्यक्षांच्या कारच्या डाव्या उजव्या बाजूला जोरदार स्फोट झाला. पुतिन यांच्या कारला सुरक्षितपणे दुसऱ्या स्थळी नेण्यात आले. सुदैवाने पुतिन यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते थोडक्यात बचावले. दरम्यान, पुतिन यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्यांपैकी अनेकांना अटक करण्यात आली आहे.

पुतिन यांच्या प्रवासाची माहिती फुटल्याने त्यांच्या अनेक सुरक्षारक्षकांना हटवण्यात आले आहे. सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन पुतिन यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनी योग्य काळजी घेत त्यांचा ताफा सुरक्षितपणे अधिकृत निवासस्थानापर्यंत आणला.

पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न नेमका कधी झाला, त्याबद्दलची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. या दाव्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पुतिन यांचा ताफा मार्गक्रमण करत असताना एक किलोमीटरवर रुग्णवाहिकेने एक कार थांबवली. ही ताफ्यातील पहिली कार होती. त्यावेळी पुतिन यांच्या कारच्या डाव्या बाजूला जोरदार आवाज झाला आणि धूर पसरला.

पुतिन यांची कार नियंत्रित करताना अडचणी येत होत्या. त्यांची कार घटनास्थळावरून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली. युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाला जबर नुकसान सहन करावे लागले आहे. त्यावरून पुतिन यांच्यावर बरीच टीका होत आहे. त्याच सुमारास पुतिन यांच्यावर जीवघेण हल्ला झाल्याचे वृत्त समोर आल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैनिकांनी रशियन फौजेला मागे ढकलून सहा हजार किमी परिसर मोकळा केल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in