खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष हवे

मध्यस्थी केंद्राच्या उद‌्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे वाढत आहेत, ज्यांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतो
खटल्यांच्या निपटाऱ्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष हवे

नवी दिल्ली : वाढत्या खटल्यांचे ओझे कमी करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयांकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी येथे केले. मध्यस्थी केंद्राच्या उद‌्घाटन समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे वाढत आहेत, ज्यांचा निपटारा कनिष्ठ न्यायालयात होऊ शकतो. छोट्या प्रकरणांमध्ये जामीन न मिळाल्याने लोक सर्वोच्च न्यायालयात येत आहेत आणि त्यामुळे तेथे कामाचा दबाव वाढत आहे.

उत्तर प्रदेशबद्दल बोलताना चंद्रचूड म्हणाले की, राज्यात गुंतवणूक वाढत आहे. राज्यात उद्योगधंदे उभारले जाणार असून, त्या दृष्टीने न्यायालयीन क्षेत्राचा विस्तार आणि विश्वास असणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. वकील आणि कायदेशीर व्यवसायातील इतरांना तंत्रज्ञानाशी संलग्न होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

logo
marathi.freepressjournal.in