अयोध्येत जाणे टाळा! पंतप्रधानांच्या केंद्रीय मंत्र्यांना सूचना

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी आटोपल्यानंतर मंगळवारपासून मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले.
अयोध्येत जाणे टाळा! पंतप्रधानांच्या केंद्रीय मंत्र्यांना सूचना

अयोध्या : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा सोमवारी आटोपल्यानंतर मंगळवारपासून मंदिर सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले. त्यानंतर प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी अयोध्येत रामभक्तांचा जनसागर उसळल्यामुळे गर्दीचे व्यवस्थापन करताना यंत्रणांची पुरती दमछाक झाली. रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत. मंदिराकडे जाणारा रामपथ भाविकांच्या गर्दीने रात्रंदिवस ओसंडून वाहत आहे. त्यामुळेच केंद्रीय मंत्र्यांनी अयोध्येत न जाणाच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बुधवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरात न जाण्याचा सल्ला केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे.

शिंदे मंत्रिमंडळ फेब्रुवारीत रामलल्लाच्या दर्शनाला

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे सदस्य फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अयोध्येत राममंदिराला भेट देऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याची शक्यता आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ही भेट ५ फेब्रुवारीला होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह २९ सदस्य आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in