अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

एक्सिओम मिशन-४ साठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला व त्यांचे सहकारी अंतराळवीर सोमवारी पृथ्वीवर परतण्यासाठी निघणार आहेत.
अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार
Published on

आयएसएस : एक्सिओम मिशन-४ साठी आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात गेलेले ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला व त्यांचे सहकारी अंतराळवीर सोमवारी पृथ्वीवर परतण्यासाठी निघणार आहेत.

सोमवारी सायंकाळी ४.३० वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावरून ‘याना’चे विलगीकरण (अनडॉकिंग) होईल. १५ तारखेला भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता कॅलिफोर्नियाजवळ प्रशांत महासागरात ते लँड करतील. ड्रॅगन अंतराळ यानातून पृथ्वीवर परतताना त्यांना जवळपास २२ तास लागतील. शुक्ला यांच्यासोबत कमांडर पॅगी व्हिटसन, स्लावोज उझान्सिस्की, टिबोर कापू आदींचा समावेश आहे. आपला मुलगा पृथ्वीवर सुखरूप परतावा, यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत, शुभांशूच्या पालकांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in