अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा : सुप्रीम कोर्टाकडून याचिका निकाली; SIT ने दाखल केले आरोपपत्र

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणाशी संबंधित स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय देताना या प्रकरणातील याचिका निकाली काढल्या असून, आता स्थानिक न्यायालयात खटला चालवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा : सुप्रीम कोर्टाकडून याचिका निकाली; SIT ने दाखल केले आरोपपत्र
अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळा : सुप्रीम कोर्टाकडून याचिका निकाली; SIT ने दाखल केले आरोपपत्रसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी अपहार प्रकरणाशी संबंधित स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय देताना या प्रकरणातील याचिका निकाली काढल्या असून, आता स्थानिक न्यायालयात खटला चालवला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारच्या या निवेदनाची नोंद घेतली की, न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. यानंतर सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने, आता राज्य सरकार कायद्यानुसार या प्रकरणातील खटला पुढे चालवू शकते, असे स्पष्ट केले आहे.

खटल्यात मदतची मुभा

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या तरतुदींचा हवाला देत खंडपीठाने स्पष्ट केले की, या प्रकरणात ‘जनहिताचा घटक’ समाविष्ट आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)