बच्चू कडूंच्या विधानामुळे आसामच्या विधानसभेत गदारोळ; म्हणाले, "इकडे येऊन माफी मागा"

आमदार बच्चू कडूंनी काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्यांना आसाममध्ये सोडा असे विधान केले होते, याचे पडसाद आसामच्या विधानसभेत उमटले आहेत
बच्चू कडूंच्या विधानामुळे आसामच्या विधानसभेत गदारोळ; म्हणाले, "इकडे येऊन माफी मागा"

आमदार बच्चू कडू हे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या विधानामुळे आसामच्या विधानसभेत गोंधळ पाहायला मिळाला. त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांबाबत केलेल्या विधानावर आसामच्या विरोधी पक्षांच्या आमदारांनी बच्चू कडू यांच्या अटकेची मागणीदेखील केली. 'बच्चू कडूंनी आसामच्या विधानसभेत येऊन जाहीर माफी मागावी' असेदेखील काही आमदारांनी मागणी केली. त्यामुळे या वादाची आता चांगलीच चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या विधानसभेत भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नवर चर्चा सुरु होती. यावेळी आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, "महाराष्ट्रातले सर्व भटके कुत्रे आसाममध्ये पाठवा. तिथे त्यांना किंमत आहे. आसाममध्ये लोक कुत्र्यांचे मांस खातात. तिथे या कुत्र्यांचा व्यापार होऊ शकतो. आम्ही गुवाहाटीला गेलो होतो तेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली." या वादग्रस्त विधानावर आसामच्या विधानसभेतील वातावरण चांगलेच तापले होते. काँग्रेस आमदार कमलाख्या डे पुरकायस्थ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, "आसामबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतरही सरकार यावर गप्प का?” असा सवाल त्यांनी केला. या सर्व प्रकरणानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण देताना म्हंटले की, "मला आसाम नव्हे तर नागालँडचे नाव घ्यायचे होते. माझ्या विधानामुळे आसाममधील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माफी मागतो."

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in