जामिनाला स्थगिती : केजरीवाल सुप्रीम कोर्टात

दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
जामिनाला स्थगिती : केजरीवाल सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली : दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मंजूर केलेल्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. कथित मद्य घोटाळ्यातील आरोपी असलेल्या केजरीवाल यांना मंजूर करण्यात आलेल्या जामिनाला दिल्ली हायकोर्टाने शुक्रवारी स्थ‌गिती दिली होती. केजरीवाल यांच्या वकिलांनी सोमवारी याबाबत सुनावणी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टाला केली आहे. या याचिकेबाबत केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्ली हायकोर्टाने ज्या पद्धतीने जामिनाला स्थगिती दिली आहे. ते कायद्याच्या विरोधात आहे. हे मूलभूत अधिकाराच्या मर्यादेचे उल्लंघन आहे. हायकोर्टाने जामिनाला स्थगिती दिल्याने आपल्या अधिकारावर गदा आली असून, हायकोर्टाचा आदेश एक क्षणही कायम ठेवता कामा नये. याचिकाकर्त्याला तत्काळ जामीन द्यावा, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in