सत्येंदर जैन यांच्या जामिनाला मुदतवाढ

सिसोदिया यांच्यावर सीबीआय आणि ईडी यांच्याकडून दोन खटले एकाच वेळी
सत्येंदर जैन यांच्या जामिनाला मुदतवाढ

नवी दिल्ली : मनी लाँड्रिंग आरोपाखाली अटकेनंतर जामिनाखाली बाहेर असलेले नवी दिल्लीचे मंत्री सत्येंदर जैन यांच्या जामीन कालावधीत सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तब्बल २४ जुलैपर्यंत वाढ केली आहे. सत्येंदर जैन यांची सक्तमजुरी संचालयातर्फे काळा पैसा पांढरा करणे प्रकरणी चौकशी सुरू आहे.

न्यायमूर्ती एस. बोपन्ना आणि न्या. एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने जैन यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांना त्यांच्या हशिलाचे वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कारण सिंघवी यांनी न्यायालयाला जैन यांच्यावर हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया आहे, असे कळवले होते. त्यानंतर २६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने जैन यांना सहा आठवडे अंतरिम जामीन मंजूर केला होता. प्रत्येक नागरिकाला स्वखर्चाने त्याच्या पसंतीच्या रुग्णालयात उपचार करून घेण्याचा अधिकार असल्याची टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली होती. गेल्या वर्षी ३० मे रोजी जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यानंतर ६ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांना सामान्य जामीन मंजूर करण्यात आला होता. दरम्यान, मनीष सिसोदिया यांच्यावरील खटल्याची सुनावणी १७ जुलैऐवजी १४ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. तशी विनंती सिसोदिया यांच्याकडून करण्यात आली होती. सिसोदिया यांच्यावर सीबीआय आणि ईडी यांच्याकडून दोन खटले एकाच वेळी सुरू आहेत.

logo
marathi.freepressjournal.in