आप खासदार संजय सिंह यांना जामीन नाकारला

या प्रकरणात आम आदमी पक्षाचे विजय नायर व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील अटक झाली असून दोघेही अजून तुरुंगातच आहेत.
आप खासदार संजय सिंह यांना जामीन नाकारला
PM

नवी दिल्ली : दिल्ली अबकारी शुल्क घोटाळा प्रकरणातील आरोपी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांचा जामीन अर्ज राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावला. सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ईडीने संजय सिंह यांच्या घरावरील धाडीनंतर ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्यांना अटक केली होती. १३ ऑक्टोबरपासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

त्यांनी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. संजय सिंह आम आदमी पक्षाचे राज्यसभेतील खासदार आहेत. दिल्लीतील मद्य घोटाळ्यांतर्गत अबकारी शुल्क धोरणाशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंग कायद्याखाली ते आरोपी आहेत. राउज अॅव्हेन्यू न्यायालयाचे विशेष सीबीआय न्यायाधीश एम. के. नागपाल यांनी शुक्रवारी संजय सिंह यांचा जामीन फेटाळला. संजय सिंह यांनी दिल्ली अबकारी धोरण ठरवण्यात तसेच त्याची अंमलबजावणी करण्यात मोलाची कामगिरी बजावली होती. या धोरणाची रचना काही ठरावीक मद्य उत्पादक आणि घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना लाभ मिळेल अशा प्रकारे करण्यात आली होती.

या प्रकरणात आम आदमी पक्षाचे विजय नायर व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना देखील अटक झाली असून दोघेही अजून तुरुंगातच आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in