कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारल्यानंतर केद्र सरकारने आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. केंद्राने यापूर्वी २० जुलै रोजी बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आगाणी सणासुदीचा काळ लक्षात घेता. देशांर्गातील किंमती नियंत्रणात रहाव्या तसंच किरकोळ बाजारातील पुरवठा वाढावा, यासाठी सरकारने हे पाऊल उचललं होतं. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाची निर्यातही बंद करण्यात आली होती.
केंद्राच्या या नवीन निर्णयामुळे, १२०० डॉलर्स प्रति टन कमी किंमतीवर सर्व बासमती तांदळाची निर्यात तात्पुरती थांबवली जाईल. केंद्राच्या या निर्णयाचा फायदा पाकिस्तानला मिळू शकेल असं मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार २०२२-२३ या वर्षात भारतानं ४.८ अब्ज डॉलर्स किंमतीचा बासमती तांदूळ निर्यात केला असून प्रमाणानुसार ही निर्यात ४.५६ दशलक्ष लट एवढी होती.
देशाच्या एकूण तांदुळ निर्यातीमध्ये बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा २५ टक्के वाटा असल्यानं अन्न मंत्रालयाने सांगितलं होतं. या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने देशातील ग्राहकांसाठी किंमत कमी होण्यास मदत होईल तसंच धान्यांच्या किंमती वाढल्यानंतर बिगर बासमती पांढर्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याच निर्णय घातल्याचं देखील अन्न मंत्रालयाने मागील महिन्यात सांगितलं होतं.