‘सिमी’वर आणखी पाच वर्षे बंदी

देशात दहशतवादाला चिथावणी देणे, शांतता आणि जातीय सलोखा बिघडवणे या कारणांमुळे सिमीवर आणखी पाच वर्षे बंदी घालण्यात आली आहे.
‘सिमी’वर आणखी पाच वर्षे बंदी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या दहशतवाद्यांना शून्य दया-माया दाखवण्याच्या धोरणास अनुसरून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी संघटनेवरील बंदीच्या कालावधीत आणखी सहा वर्षे वाढ करण्यात आल्याची घोषणा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी एक्सवरील पोस्टच्या माध्यमातून केली आहे. देशात दहशतवादाला चिथावणी देणे, शांतता आणि जातीय सलोखा बिघडवणे या कारणांमुळे सिमीवर आणखी पाच वर्षे बंदी घालण्यात आली आहे.

सर्वप्रथम २००१ साली सिमी संघटनेवर बेकायदेशीर कारवाया करणारी संघटना, असा शिक्का मारण्यात आला होता. तेव्हा देशात भाजपचे वाजपेयी सरकार होते. तेव्हापासून सातत्याने ही बंदीची मुदत वाढवण्यात आली आहे. बेकायदेशीर कारवायांत सहभाग असल्यामुळे या संघटनेवर बंदी घालण्यात आल्याचे शहा यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले असून त्यानुसार अनलॉफूल ॲक्टिव्हीटी प्रिव्हेंशन ॲक्ट (यूएपीए) कायद्यांतर्गत ही बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश या देशातील १० राज्यांनी सिमी संघटनेवर बंदी घालण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणे, देशातील जातीय सलोखा आणि शांतता बिघडवणे, या अन्वये देशाच्या सार्वभौमत्व, सुरक्षा आणि एकात्मतेला धोका निर्माण करणे यासारख्या कारवायात सिमी संघटना गुंतली असल्याचे शहा यांनी सांगितले आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिसूचना काढली असून त्यात सिमी संघटना देश विध्वंसक कारवाया करीत असल्याचे तसेच फरार सदस्यांना जमा करून पुन्हा कारवाया सुरू करण्यात मग्न असल्याचे म्हटले आहे.

ही संघटना तरुणांची मने कलुषित करून देशाच्या धर्मनिरपेक्षतेला हानी पोहोचवत असल्याचेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यासाठी ही संघटना देशातील जातील सलोखा बिघडवत आहे, राष्ट्रद्रोही प्रचाराच्या माध्यमातून दहशतवादाला खतपाणी घालत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन केंद्र सरकारने या संघटनेवरील बंदीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. सिमीच्या हस्तकांवर १७ खटले सुरू आहेत, तर २७ हस्तकांना सजा झाली आहे. सिमीचे माजी केडर ए. आर. कुरेशी यांच्यावर एनआयचा खटला सुरू आहे. त्याच्यावर इस्लामिक जिहादसाठी इसिसमध्ये तरुणांची भरती करण्यासाठी कट रचला असल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच सिमी समर्थक उमेर सिद्दिकी याच्यावर देखील बंदी असलेल्या इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या हस्तकांना आश्रय दिल्याचा गुन्हा दाखल आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in