पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ११ सप्टेंबर रोजी बँक संघटनांचा संप

५ दिवसांचा बँक कार्यआठवडा लागू करण्यास होणारा विलंब, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजनेतील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित मुद्द्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ ने ११ सप्टेंबर रोजी देशभरात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ११ सप्टेंबर रोजी बँक संघटनांचा संप
पुढील आठवड्यात बँका चार दिवस बंद; ११ सप्टेंबर रोजी बँक संघटनांचा संप
Published on

नवी दिल्ली : ५ दिवसांचा बँक कार्यआठवडा लागू करण्यास होणारा विलंब, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन योजनेतील मतभेद आणि पेन्शनशी संबंधित मुद्द्यांसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ ने ११ सप्टेंबर रोजी देशभरात संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप झाल्यास, देशातील अनेक भागांमध्ये, विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची सेवा सलग चार दिवस प्रभावित होण्याची शक्यता आहे.

११ सप्टेंबर रोजी शुक्रवार आहे, तर त्यापुढील दोन दिवस (शनिवार आणि रविवार) बँकांना सुट्टी आहे. तसेच, १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवा निमित्त काही राज्यांमध्ये बँकेला सुट्टी आहे.

सात बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची मुख्य संस्था असलेल्या ‘यूएफबीयू’ने २८ सप्टेंबरपासून सलग तीन दिवसांच्या संपाचा इशाराही दिला आहे. शासनाने आणि बँक व्यवस्थापनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २६ ऑक्टोबरपासून अनिश्चित काळासाठी संप करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. ५ दिवसांच्या कार्यआठवड्याबाबत, ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ने ८ मार्च २०२४ रोजी स्वाक्षरी केलेल्या १२ व्या द्विपक्षीय करारात/९ व्या संयुक्त टीपेमध्ये या प्रस्तावाला संमती दिली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in