गँगरेपनंतर तलवारीनं कापली बोटे...बांसवाडा घटनेची हादरवून टाकणारी कहाणी, आरोपींनी गाठला क्रूरतेचा कळस

सामूहिक बलात्कारानंतर तलवारीने कापली बोटे, जाणून घ्या बांसवाडा घटनेची भीषण कहाणी...
बांसवाड राजस्थान बलात्कार
बांसवाड राजस्थान बलात्कारप्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूने वापरली जाते

दिल्ली: दिल्लीतील निर्भया प्रकरणाच्या कटू आठवणी देश अजूनही विसरला नाही. अशातच आता राजस्थानधील बांसवाडा येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका तरूणीला भररस्त्यात अडवून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली आहे. क्रूरतेचा कळस म्हणजे बलात्कारानंतर नराधमांनी पीडितेवर तलवारीनं कैक वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

त्या रात्री काय घडलं?

५ मे रोजी रात्री गावातील एका घरात लग्नाची तयारी सुरू होती. लग्नघरी हळदी समारंभ होणार होता. त्यामुळे शेजारी राहणारी मुलगी रात्री आठ वाजता तिचे दोन लहान भाऊ आणि वडिलांसह तेथे पोहोचली. हळदी समारंभ पूर्ण विधी संपन्न झाल्यानंतर मुलगी रात्री 2 वाजता एकटीच तिच्या घराकडे जात होती.

त्यानंतर, तिच्या घरापासून सुमारे 300-400 मीटर अंतरावर, एका पुलाजवळ दुचाकीवरून दोन मुले तेथे पोहोचली आणि त्यांनी मुलीचा रस्ता अडवला. त्यापैकी एका मुलाला मुलगी ओळखत होती. मुलाने मुलीला विचारले की ती त्याच्यासोबत लग्न का करत नाही. यावर ती सध्या शिकत असल्याचं सांगून मुलीने उत्तर लग्नास नकार दिला.

आधी बलात्कार, नंतर तलवारीने वार-

पोलिस एफआयआरनुसार, यानंतर दोन्ही मुलांनी मुलीला बळजबरीने पकडून एक एक करून तिच्यावर बलात्कार केला. मुलांना तिला जीवंत सोडायचं नव्हतं. यानंतर एका मुलाने मुलीवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण ती कशीतरी तिथून निसटली. रात्रीच्या अंधारात मुलगी पुढे पळत होती आणि दोन्ही आरोपी तिचा पाठलाग करत होते. काही अंतर गेल्यावर मुलगी खड्ड्यात पडली.

त्यानंतर दोन्ही आरोपी तिथं पोहोचले आणि त्यांनी तरुणीवर तलवारीनं हल्ला केला. मुलीनं स्वत:चं रक्षण करण्यासाठी डोक्यावर हात वर केला. तिचा तळहात कापला गेला आणि दोन बोटे आणि उजव्या हाताचा अंगठाही कापला गेला. ती रक्ताने माखलेली होती. मात्र त्यानंतरही हल्लेखोर थांबले नाहीत. यानंतर त्याने मुलीच्या डोक्यावर तलवारीने वार केले. तिच्या डोक्यालाही दुखापत झाली. ती मदतीसाठी ओरडत राहिली.

पोलिसांनी नोंदवला पीडितेचा जबाब-

गुन्हा केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर रक्तबंबाळ झालेली मुलगी पाहून कोणीतरी ग्रामस्थांना माहिती दिली. यानंतर मुलीनं घडला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला आणि त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिला उदयपूर येथे हलवण्यात आले. आता राजकीय M.B. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी तातडीनं कारवाईस सुरुवात केली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी कलम १६४ अन्वये तिचा जबाबही नोंदवला आहे. माहिती देताना परिसरातील डीएसपी म्हणाले की, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

लग्नाला नकार दिल्याचा होता राग-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीचे नाव काळूराम असे आहे. तो B.S.T.C. द्वितीय वर्षात शिकत आहे. तर १९ वर्षीय पीडित मुलगी बी.ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. पीडित तरुणी आणि आरोपी काळूराम हे एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखतात, परंतु पीडितेचे कुटुंबीय लग्नाला नकार देत होते.

काही दिवसांपूर्वीही पीडितेने त्याच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. त्यावर आरोपी काळूरामने पीडितेच्या गावी पोहोचून तिला भेटायला बोलावले. यावेळी त्याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला आणि नंतर तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवारीने वार केले.

स्वतः एसपीचं तपासात लक्ष-

या घटनेसंदर्भात, पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील दानपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 341, 307, 376D, 34 अन्वये गुन्हा 108/2024 दाखल केला आहे. पोलिस उपअधीक्षक सूर्यवीरसिंह राठोड यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बांसवाराचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाल स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

logo
marathi.freepressjournal.in