‘बार बार मोदी सरकार’ पण ‘और कितनी बार मोदी सरकार’, प्रियंका गांधी-वडेरा यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशचेही देवभूमी असे वर्णन केले होते. निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आणि काही महिन्यांनी आपत्ती ओढवली, तेव्हा मोदी सरकारने राज्यातील जनतेला दिलासा म्हणून एक पैसाही दिला नाही. राज्य सरकारने स्वतःच्या संसाधनातून सर्व दिलासा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘बार बार मोदी सरकार’ पण ‘और कितनी बार मोदी सरकार’, प्रियंका गांधी-वडेरा यांचा सवाल

रामनगर (उत्तराखंड) : भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत मतांसाठी धर्माचा वापर करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा ‘बार बार मोदी सरकार’ असा शब्दप्रयोग करतात तेव्हा त्यांना 'और कितनी बार मोदी सरकार' असे विचारावेसे वाटते, असा सवाल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तराखंडमधील रामनगर येथे एका निवडणूक प्रचारसभेत बोलताना केला.

त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात वापरलेल्या शब्दांच्या भानगडीत पडू नये आणि आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तनासाठी मतदान करावे. निवडणुका खऱ्या मुद्द्यांवर लढल्या पाहिजेत, रिकाम्या भाषणबाजीच्या आधारे नव्हे. मोदीजींनी त्यांच्या निवडणुकीच्या भाषणात वापरलेल्या शब्दांच्या भानगडीत लोकांनी पडू नये. असे सांगून प्रियंका गांधी यांनी लोकांना विचार करण्यास सांगितले की, त्यांनी मतदान करण्यापूर्वी प्रामाणिकपणे स्वतःला विचारा की मोदी सरकारच्या दहा वर्षांनी तुमच्या आयुष्यात खरोखरच सकारात्मक बदल घडवून आणला आहे का?

मोदींनी राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी हिमाचल प्रदेशचेही देवभूमी असे वर्णन केले होते. निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवला आणि काही महिन्यांनी आपत्ती ओढवली, तेव्हा मोदी सरकारने राज्यातील जनतेला दिलासा म्हणून एक पैसाही दिला नाही. राज्य सरकारने स्वतःच्या संसाधनातून सर्व दिलासा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. प्रियंका गांधी यांनी दावा केली की, भाजप नेते देवभूमी हा शब्द निवडणुकीच्या भाषणात राजकीय कारणांसाठी वापरतात.

आपल्या हृदयात खरा विश्वास

त्याग हे हिंदू धर्माचे सर्वात मोठे मूल्य आहे. खरी श्रद्धा बलिदानातून येते. मला त्यागाची माहिती आहे. असे सांगून प्रियंका गांधी म्हणाल्या, की मी १९ वर्षांची असताना माझ्या वडिलांच्या शरीराचे अवयव माझ्या आईसमोर ठेवले आहेत. पण, जेव्हा ते आमच्या शहीद वडिलांचा अपमान करतात तेव्हा आम्ही मौन बाळगतो, कारण आपल्या हृदयात खरा विश्वास आहे.

logo
marathi.freepressjournal.in