सणासुदीत अंघोळीचा साबण झाला स्वस्त

प. विभागात हिंदुस्थान युनिलिव्हरने लाईफबॉयपासून लक्स या साबण्याच्या किंमतीत ५ ते ११ टक्के कपात केली
सणासुदीत अंघोळीचा साबण झाला स्वस्त

रोजच्या आंघोळीसाठी साबण अत्यंत महत्वाचा आहे. साबणाच्या किंमती किती वाढतात किंवा कमी होतात, याकडे सर्वांचे लक्ष असते. गेल्या काही महिन्यांपूर्वी कच्चा माल महाग झाल्याने साबण महागले होते. आता पामतेल आणि कच्च्या मालाचे दर कमी झाल्याने हिंदुस्थान युनिलिव्हर व गोदरेज कंझ्युमर प्रॉ. लिमिटेडने आपल्या साबणांच्या किंमतीत १५ टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे साबण स्वस्त झाले आहेत.

प. विभागात हिंदुस्थान युनिलिव्हरने लाईफबॉयपासून लक्स या साबण्याच्या किंमतीत ५ ते ११ टक्के कपात केली. गोदरेज कंझ्युमर प्रॉ. लिमिटेडने आपल्या ‘गोदरेज नं १’ या साबण्याच्या किंमतीत १३ ते १५ टक्के कपात केली.

कंपन्यांनी साबणाच्या किंमतीत कपात केल्याने दुसऱ्या सहामाहीत त्यांच्या विक्रीत वाढ होईल, असे तज्ज्ञांनी सांगितले. महागाईमुळे सध्या अनेक वस्तूंच्या विक्रीत घट झाली आहे. जागतिक पातळीवर पामतेल व अन्य कच्च्या मालाच्या दरात कपात झाली आहे.

गोदरेज कंझ्युमर प्रॉ. लिमिटेडचे मुख्य वित्त अधिकारी समीर शहा म्हणाले की, कच्च्या मालाच्या किंमती कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी आम्ही साबणाच्या किंमती कमी करत आहोत. आमच्या कंपनीच्या साबणाच्या किंमती १३ ते १५ टक्क्याने कमी झाल्या आहेत. तर एचयूएलच्या प्रवक्त्याने सांगितले की, प. विभागात लाईफबॉय व लक्सच्या किंमतीत घट झाली आहे. अन्य विभागतही साबणांच्या किंमती घटवल्या जातील. दरम्यान, लाईफबॉय व लक्सच्या किंमतीत ५ ते ११ टक्के घट झाल्याची माहिती मिळत आहे.

महागाईचे कंपन्यांपुढे आव्हान

साबण दराच्या कपातीबाबत एडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसचे कार्यकारी उपाध्यक्ष अबनीश रॉय म्हणाले की, कच्च्या मालाच्या किंमती घसरल्याने दर कपात केल्याने कंपनीचा बाजारातील हिस्सा कायम राहण्यास मदत मिळणार आहे. एचयूएलच्या विक्रीत दुसऱ्या सहामाहीत व २०२४ मध्ये वाढ झालेली दिसू शकते. गेले वर्षभर दरवाढ व साबणाच्या वडीचे वजन कमी झाले होते. त्याचा मोठा परिणाम कंपनीच्या विक्रीवर झाला होता. आता किंमत कमी होऊन वजन वाढल्याने त्याचा मोठा फायदा होईल, असे रॉय म्हणाले. वाढत्या महागाईमुळे एफएमसीजी कंपन्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in