हिवाळ्यात 'मध' खाण्याचे 'हे' आहेत फायदे, मेंदूतील कमकुवतपणा होतो दूर

दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उत्साही राहते परंतु थंडीमध्ये मध खाल्ल्याने मधाचे शरीराला खूप फायदे होतात.
हिवाळ्यात 'मध' खाण्याचे 'हे' आहेत फायदे, मेंदूतील कमकुवतपणा होतो दूर

मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे. बऱ्याच आजारांवर मधाचा औषधी म्हणुण वापर केला जातो. दररोज मध सेवन केल्याने त्वचेच्यासंबंधी आजार नाहीसे होतात. दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्याने शरीर निरोगी, उत्साही राहते परंतु थंडीमध्ये मध खाल्ल्याने मधाचे शरीराला खूप फायदे होतात. थंडीत वातावरणातील गारवा आणि शरिरात होणारे बदल यासाठी मध ही अतिशय गूणकारी आहे.

मधाचे आरोग्यदायी फायदे-

1- मध खाल्ल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्यामध्ये पटकन भूक लागत नाही त्यामुळे भरपूर भूक लागण्यासाठी मध उपयोगी ठरतो त्याचप्रमाणे मधाच्या सेवनाने ताजेतवाने राहण्यास मदत तर होतेच, शिवाय पाचन शक्ती सुधारते.

2- खाज, खरूज यासारख्या त्वचेसंबंधीत आजारांचा ज्यांना त्रास होतो त्यांनी ग्लासभर पाण्यात एक चमचा मध घालून सकाळी रिकाम्या पोटी प्यावे. त्यामुळे या त्वचा रोगांचा त्रास कमी होतो.व्हिटामीन ए, बी, सी, आयर्न, कॅल्शियम, सोडियम फॉस्फोरस, आयोडिन असते. रोज मध खाल्याने शरिरात शक्ती, स्फूर्ती निर्माण करून रोगांशी लढा देण्याची शक्ती वाढवतो.

3- कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा यामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यात आराम मिळतो. उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लॅड प्रेशरमध्ये मध खूप उपयोगी ठरते.

4- रक्ताला स्वच्छ करण्यासाठी मधाचा वापर केला पाहिजे.हृदय मजबूत करण्यासाठी आणि हृदय योग्य पद्धतीने कार्य करण्यासाठी आणि हृदयाच्या रोगापासून वाचण्यासाठी मध खाल्ले पाहिजे.

5- रोज मध खाल्याने आरोग्य कायम राहते आणि शरीर स्थूल होत नाही आणि मेंदूतील कमकुवतपणा दूर होतो.मधाचे सेवन केल्यावर पिंपल्स दूर करण्यात उपयोगी ठरते. तुम्ही गुलाब पाणी, लिंबू आणि मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो.

6- चेहऱ्या कोरडेपणा दूर करण्यासाठी मध, साय आणि बसन यांचे उटणे लावल्यास चेहरा मुलायम होतो. यामुळे चेहऱ्यात चमक येईल. रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात. मध जखमेला स्वच्छ करणे, दुर्गंधी आणि दुखण्याला दूर करणे आणि लवकर बरी करण्यात उपयोगी ठरते.

logo
marathi.freepressjournal.in