
मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारामुळे शेकडो महिलांना फटका बसला आहे. या हिंसाचारात सर्वस्व गमावून बसलेल्या नागरिकांची पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी विचारपूस केली.
ते म्हणाले की, हिंसेचा मार्ग निवडणारी मानसिकता मुळापासून काढून टाकणे गरजेचे आहे. पश्चिम बंगालमध्ये शांतता व सौहार्द कायम ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. त्यातूनच हिंसाचार कमी होऊ शकेल.
मुर्शिदाबाद आणि मालदासारखा हिंसाचार होऊ नये. बंगालच्या रस्त्यावर मृत्यूचे तांडव सुरू आहे. हा प्रकार सहन केला जाऊ शकत नाही. हिंसेविरोधात लढाई लढणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.