गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता ;६ वी ते ८ वी इयत्तेच्या पुस्तकात समावेश

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पानशेरिया म्हणाले की, पाठ्यपुस्तकाचा हा पहिला भाग आहे, जो इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे
गुजरातमध्ये शालेय अभ्यासक्रमात भगवद्गीता
;६ वी ते ८ वी इयत्तेच्या पुस्तकात समावेश
PM
Published on

अहमदाबाद : पुढील शैक्षणिक वर्षापासून गुजरातमधील इयत्ता ६ वी ते ८ वीच्या अभ्यासक्रमात 'भगवद्गीता' या विषयावरील पूरक पाठ्यपुस्तक समाविष्ट केले जाणार आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी दिली. केंद्राने तीन वर्षांपूर्वी तयार केलेल्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (एनईपी) आराखड्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

राज्याच्या शिक्षण विभागाने एनईपी-२००० अंतर्गत श्रीमद भगवद्गीतेतील अध्यात्मिक तत्त्वे आणि मूल्ये इयत्ता ६ वी ते ८ वीच्या अभ्यासक्रमात पूरक पाठ्यपुस्तक म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रफुल्ल पानशेरिया यांनी एक्सवरही केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या निर्णयाबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे आभार मानून पानशेरिया यांनी सांगितले की, अशा शैक्षणिक निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अभिमान वाटेल आणि 'श्रीमद भगवद्गीते'च्या शिकवणीद्वारे भारतातील समृद्ध, वैविध्यपूर्ण, प्राचीन संस्कृती आणि ज्ञान प्रणाली आणि परंपरांशी जोडले जातील. महाभारताचा एक भाग असलेल्या आदरणीय ग्रंथावरील पूरक पाठ्यपुस्तक विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्ये रुजवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०' अंतर्गत घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांमधील मूल्ये सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पानशेरिया म्हणाले की, पाठ्यपुस्तकाचा हा पहिला भाग आहे, जो इयत्ता ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि लवकरच तो राज्यभरातील शाळांमध्ये पाठवला जाईल. ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी दोन भाग लवकरच उपलब्ध करून दिले जातील. 

logo
marathi.freepressjournal.in