पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर विषप्रयोग? फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना पोलोनियम या विषारी पदार्थाने संक्रमित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांवर विषप्रयोग? फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू
Published on

लुधियाना : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सध्या फोर्टिस रुग्णालयात उपचार घेत असून त्यांना पोलोनियम या विषारी पदार्थाने संक्रमित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, फोर्टिस रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवारी दुपारी १ वाजता प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे.

या ई-मेलमुळे संपूर्ण पंजाब हादरले असून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी रुग्णालय परिसराला वेढा घातला. मोहालीतील १६ हून अधिक नामांकित शाळांना ई-मेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसरात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. ई-मेलमध्ये दुपारी १:११ वाजता बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ई-मेलमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह आणि चिंताजनक मजकूर लिहिण्यात आला आहे. “भाई दिलावर सिंग यांच्या वारसांनी मान यांना ‘पोलोनियम’ या विषारी रेडिओएक्टिव्ह पदार्थाने संक्रमित केले आहे,” असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर, "जर ते वाचले, तर त्यांचे हाल माजी मुख्यमंत्री बिआंत सिंग यांच्यासारखे केले जातील. फोर्टिस रुग्णालयातून मुख्यमंत्र्यांचा मृतदेहच बाहेर निघेल, अशी धमकी या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in