कामगार कायद्याविरोधात आज 'भारत बंद'; बँक कर्मचारीही सहभागी होणार

संपाचे मुख्य कारण केंद्र सरकारचे ४ नवीन कामगार कायदे आहेत. हे कायदे २९ जुन्या कामगार कायद्यांची जागा घेतील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अधिकारांमध्ये कपात होईल आणि ट्रेड युनियनची नोंदणी करणे कठीण होईल, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.
कामगार कायद्याविरोधात आज 'भारत बंद'
कामगार कायद्याविरोधात आज 'भारत बंद'छायाचित : पीटीआय
Published on

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्याविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी गुरुवारी (१२ फेब्रुवारी) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

संपाचे मुख्य कारण केंद्र सरकारचे ४ नवीन कामगार कायदे आहेत. हे कायदे २९ जुन्या कामगार कायद्यांची जागा घेतील, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अधिकारांमध्ये कपात होईल आणि ट्रेड युनियनची नोंदणी करणे कठीण होईल, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

केंद्र सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलांमुळे कामगारांच्या समोर विविध प्रश्न व समस्या निर्माण झाल्या आहेत. कामगार कायद्यातील बदलामुळे कामगारांच्या हिताला बाधा पोहचलेली आहे. या नव्या बदलांमुळे कामगारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. यामुळे देशात महागाई व बेकारी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या कामगारविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ देशभरातील कामगार संघटनांनी गुरुवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

बँक कर्मचारीही सहभागी होणार

देशातील मोठ्या बँक संघटना, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया यांनी या संपात सहभागी होण्याची घोषणा केली आहे. संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान, बँकिंग क्षेत्रात '५-डे वर्क वीक' (आठवड्यातून ५ दिवस काम) लागू करण्याची मागणीही बँक कर्मचारी करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in