मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात; 20 मार्च रोजी गाठणार मुंबई

सुरुवातीला ही यात्रा मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथून सुरु होणार होती. मात्र, राज्यातील तणावाची परिस्थिती बघता मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे इंफाळपासून 25 किमी अंतरवार असलेल्या थौबल जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात करण्यात आल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.
मणिपूरमधून 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात; 20 मार्च रोजी गाठणार मुंबई

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मणिपूरच्या थौबल जिल्ह्यातून 'भारत जोडो न्याय यात्रे'ला सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. या यात्रेत सहभागी होण्यासाठी दिल्लीतून काँग्रेस नेत्यांचे विशेष विमान मणिपूरच्या दिशेने रवाना झाले होते.

सुरुवातीला ही यात्रा मणिपूरची राजधानी असलेल्या इंफाळ येथून सुरु होणार होती. मात्र, राज्यातील तणावाची परिस्थिती बघता मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे इंफाळपासून 25 किमी अंतरवार असलेल्या थौबल जिल्ह्यातून या यात्रेला सुरुवात करण्यात आल्याचे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले.

"मी 2004 पासून राजकारणात आहे. मी पहिल्यांदा देशातील अशा राज्यात गेलो, जेथील शासन व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. ज्याला आपण मणिपूर म्हणतो ते आता मणिपूर राहिले नाही. पण, पंतप्रधान तुमचे अश्रू पुसायला, तुम्हाला भेटायला आले नाहीत", असे राहुल गांधी यांनी यात्रेला संबोधित करताना म्हणाले.

'भारत जोड़ो यात्रा' सकाळी 6 वाजेपासून सुरु होऊन संध्याकाळी 7 वाजेपर्यंत चालायची. शेवटी आमचे 20-25 मिनटांचे भाषण असायचे. 7-8 तास आम्ही तुमचे ऐकत होतो. या यात्रेचे देखील हेच लक्ष्य आहे. आम्ही तुम्हाला आमचे ऐकवायला नाही तर तुमचे ऐकायला, तुमचे दु:ख, वेदना समजून घ्यायला, आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.

'भारत जोडो न्याय यात्रा' मणिपूरपासून निघून 20 मार्च रोजी मुंबई गाठणार आहे. ही यात्रा या प्रवासात 6 हजार 713 किमीचा प्रवास करणार आहे. राहुल गांधी हे काँग्रेसच्या 60 ते 70 नेत्यांसह बसच्या माध्यमातून हे अंतर पार करणार आहेत. तसेच, काही प्रमुख ठिकाणी पायी प्रवास केला जाणार आहे. 67 दिवसांच्या प्रवासात ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यातून जाणार आहे. राहुल गांधी या यात्रेत 355 लोकसभा मतदारसंघांना कव्हर करणार असल्याचेही सांगितले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in