भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल.
भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी अमेठीत

अमेठी : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास अमेठीत दाखल होईल, असे पक्षाच्या जिल्हा युनिटच्या पदाधिकाऱ्याने रविवारी सांगितले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वड्रा याही राहुल यांच्यासोबत अमेठीत येतील, असे पक्षाने सांगितले.

राहुल गांधींच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'ची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. काकवामध्ये राहुल गांधींचे सर्वप्रथम स्वागत केले जाईल. त्यांची न्याय यात्रा प्रतापगढ जिल्ह्यातील रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून अमेठी सीमेवर दाखल होईल, असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in