नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या भेलने मंगळवारी डिसेंबर २०२३ ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत १४८.७७ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा झाला. जास्त खर्चामुळे नफा घसरला. मागील २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत कंपनीने ४२.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता, असे कंपनीने एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनीचे एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या ५,३५३.९४ कोटी रुपयांनी वाढून ५,५९९.६३ कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीतील ५,३२०.८४ कोटी रुपयांवरून त्याचा खर्च वाढून ५,८१६.८७ कोटी रुपये झाला आहे.
आइस मेक रेफ्रिजरेशनच्या महसुलात २३ टक्के वाढ
आईस मेक रेफ्रिजरेशन लिमिटेडच्या आर्थिक वर्ष २४ च्या तिसऱ्या तिमाहीत एकत्रित महसुलात लक्षणीय २३.५० टक्के वाढ होऊन ८२.५२ कोटी झाला. गेल्या आर्थिक वर्षात ६६.८१ कोटी महसूल मिळाला होता. यामुळे तिमाही एकत्रित निव्वळ नफ्यात २.०१ कोटी झाला. मागील तिमाहीत तो ४.४३ कोटी झाला होता, असे आईस मेक रेफ्रिजरेशन लिमिटेडचे सीएमडी चंद्रकांत पटेल म्हणाले.तथापि, आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या नऊ महिन्यांत ८.५७ टक्के वाढीसह ११.८७ कोटी नफा कमावला.मागील वर्षी वरील तिमाहीत १२.१७ कोटी रु. झाा होता.
व्हॅरेनियम क्लाउड लि.च्या निव्वळ नफ्यात भरीव वाढ
मुंबई : मुंबईस्थित टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कंपनी व्हॅरेनियम क्लाऊड लि.ने एकूण उत्पन्न आणि निव्वळ नफ्यात भरीव वाढीसह व्यवसाय ऑपरेशन्समध्ये झपाट्याने वाढ नोंदवली आहे. कंपनीने २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीत २९.२९ कोटी रुपयांच्या तुलनेत प्रतिवर्ष १९६ टक्केची वाढ डिसेंबर २०२३ ला संपलेल्या २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत ८७.६८ कोटी रुपयांचा कंपनीने एकत्रीत नफ नोंदविला. २०२३ मधील इबीटा ३९.४० कोटींवरून २०५ टक्क्यांनी वाढून २०२४ च्या पहिल्या तिमाहीत तो १२०.९५ कोटी झाला. डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, कंपनीने एकूण ७७९.१९ कोटी, रुपयांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत २३४ टक्के प्रतिवर्ष २३३ कोटींची वाढ नोंदवली आहे.
सीमेन्सचा निव्वळ नफा ५०६ कोटींवर
सीमेन्स लिमिटेडला मंगळवारी ३१ डिसेंबर रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ९.२ टक्क्यांनी वाढ होऊन ५०५.७ कोटींवर गेला आहे. कंपनी ऑक्टोबर ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाचे अनुसरण करते. मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर कालावधीत कंपनीने ४६२.७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला होता, असे सीमेन्स लिमिटेडने एका एक्स्चेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. कंपनी एकूण उत्पन्न मागील वर्षीच्या ४,११६.८ कोटी रुपयांपेक्षा वाढून ४,९८९.३ कोटी रुपये झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ते ३,४९५.७ कोटी रुपयांच्या तुलनेत खर्च ४,३११ कोटी रुपये झाला. एका वेगळ्या निवेदनात कंपनीने सांगितले की, तिला पहिल्या तिमाहीत ५,९७१ कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.