
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या हैदराबाद आणि चेन्नईला भेट देणार आहेत. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास,पंतप्रधान इंडियन स्कूल ऑफ बिझनेस(ISB), हैदराबाद या व्यवस्थापन संस्थेच्या द्विदशकपूर्ती समारंभात सहभागी होणार आहेत. संध्याकाळी पंतप्रधान चेन्नईच्या जेएलएन इनडोअर स्टेडिअममध्ये ३१४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ११ प्रकल्पांसाठी पायाभरणी करुन, काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित करतील.
पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी, दळणवळण वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील जनतेच्या जीवन सुलभतेला चालना देण्यासाठी काही प्रकल्प, पंतप्रधान यावेळी राष्ट्राला समर्पित करतील; तसेच चेन्नईमध्ये ३१,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ११ प्रकल्पांची पायाभरणी करतील.या प्रकल्पांमुळे या भागातील सामाजिक-आर्थिक समृद्धीत लक्षणीयरीत्या भर पडण्यास मदत होईल, विविध क्षेत्रांत परिवर्तन होईल आणि रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होण्यास चालना मिळेल.
चेन्नईमध्ये पंतप्रधान २९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे पाच प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत. ७५ किमी लांबीच्या मदुराई-तेनी या सुमारे ५०० कोटी रुपये प्रकल्पखर्चाच्या या प्रकल्पामुळे या भागात सुगमता निर्माण होऊन या प्रदेशातील पर्यटनाला चालना मिळेल. सुमारे ८५० कोटी रुपये प्रकल्पखर्चाचा ११५ किमी लांबीचा एन्नोर-चेंगलपट्टू आणि सुमारे ९१० कोटी रुपये प्रकल्पखर्चाची ईटीबीपीएनएमटीच्या तिरुवल्लूर-बेंगळुरू क्षेत्रातील २७१ किमी लांबीची नैसर्गिक गॅस पाईपलाईन यामुळे तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधील उद्योगांना तसेच इतर ग्राहकांना नैसर्गिक वायूचा पुरवठा सुलभ होईल.