मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे.
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी
मुंबई पोलिसांची मोठी कामगिरीप्रातिनिधिक फोटो

मुंबई : मुंबई पोलिसांनी राजस्थानमधील जोधपूर येथील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा भांडाफोड केला आहे. मुंबई पोलिसांनी येथून तब्बल १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत राजस्थानमधील जोधपूर येथील बेकायदेशीर एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश केला. मुंबई पोलिसांनी येथून सुमारे १०७ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकानं राजस्थानमधील जोधपूर येथील एमडी ड्रग्ज कारखाना शोधून काढला. या ठिकाणाहून पोलिसांना मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा सापडला. पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केलं असून त्याची किंमत सुमारे १०७ कोटींच्या घरात आहे. या ड्रग्ज फॅक्टरीचं देशातील इतर भागांत कनेक्शन असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरु आहे.

logo
marathi.freepressjournal.in