प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्या अनेक युट्युब चॅनेलवर सरकारची मोठी कारवाई

प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्या अनेक युट्युब चॅनेलवर सरकारची मोठी कारवाई

हे YouTube चॅनल दहशत निर्माण करण्यासाठी, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरवत होते
Published on

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित प्रचार प्रसारित केल्याबद्दल 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानीसह 16 यूट्यूब न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत. त्यांचा वापर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात होता.

हे YouTube चॅनल दहशत निर्माण करण्यासाठी, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी आणि भारतातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवण्यासाठी खोटी माहिती पसरवत होते. ब्लॉक केलेल्या चॅनेलचे ६९ कोटींहून अधिक दर्शक होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने IT नियम, 2021 अंतर्गत कारवाई केली आहे. हे YouTube चॅनल प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी काही वृत्तवाहिन्यांच्या लोगो आणि थंबनेल देखील गैररित्या वापरत होते. 

जम्मू-काश्मीर, भारतीय लष्करापासून ते युक्रेनमधील परिस्थितीपर्यंत अनेक विषयांवर या वाहिन्या दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्या प्रसारित करत होत्या. त्यात काही दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्याही होत्या ज्यांचा भारताच्या इतर अनेक देशांसोबतच्या संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यापूर्वी 22 यूट्यूब चॅनल ब्लॉक करण्यात आले होते. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल केंद्र सरकारने यापूर्वी पाकिस्तानमधील 4 यूट्यूब न्यूज चॅनेलसह 22 यूट्यूब चॅनेल ब्लॉक केले होते. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, या चॅनेल्स तत्काळ प्रभावाने ब्लॉक करण्यात आल्या आहेत. भारताविरोधात अपप्रचार करणाऱ्या अशा वाहिन्यांवर पुढील कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in