विरोधी पक्षातील नेत्यांचा मोठा निर्णय ; पुढच्या आठवड्यात करणार मणिपूरचा दौरा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी मणिपूर घटनेवर चर्चा घेण्याची मागणी केली. यावेळी संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला
विरोधी पक्षातील नेत्यांचा मोठा निर्णय ; पुढच्या आठवड्यात करणार मणिपूरचा दौरा

मणिपूरमध्ये मागील काही महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. अशात मणिपूरमधील मे महिन्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली. या व्हिडिओत पुरुषांचा जमाव दोन महिलांची नग्न धिंड काढताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील या घटनेची दखल घेत केंद्र सरकारला खडसावलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.

विरोधी पक्षांकडून मात्र मणिपूर सराकरवर तसंच केंद्र सरकारवर सडकून टीका केली जात आहे. आता विरोधांकाच्या 'इंडिया' या आघाडीतील नेते मणिपूरचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवार (२४) जुलै रोजी सकाळी संसदेत विरोधीपक्षांची बैठक आहे. या बैठकीत मणिपूरच्या दौऱ्याची तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष पुढच्या आठवड्यात मणिपूरचा दौरा करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील मणिपूरला जाण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत त्यांची इतर राज्याच्या मुख्यमंत्र्याशी देखील चर्चा सुरु आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यादेखील मणिपूर दौऱ्याबाबत चर्चा झाली असल्याचं सांगतिलं जात आहे.

संसदेत देखील मणिपूच्या घटनेवर आणि सुरु असलेल्या हिंसाचारावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी मणिपूर घटनेवर चर्चा घेण्याची मागणी केली. यावेळी संसदेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे सोमवारपर्यंत संसदेचं कामकाच तहकुब करण्यात आलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in