भाजपचे मोठे नेतेही झाले रामभक्तीत लीन

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा शहरातील विविध भागात टीव्हीवर लाइव्ह पाहिला.
भाजपचे मोठे नेतेही झाले रामभक्तीत लीन

नवी दिल्ली : अयोध्येत श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, आरएसएस प्रमुख मोहन भागवत हे मान्यवर उपस्थित होते. मात्र एरव्ही सावलीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यासोबत असणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्राणप्रतिष्ठादिनी मात्र अयोध्येऐवजी नवी दिल्लीतीच होते. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नवी दिल्लीतील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात त्यांनी प्रार्थना केली.

त्याचप्रमाणे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या निवासस्थानी प्रार्थना केली. त्यांनी एक्सवर संदेश देखील शेअर केला. भाजपच्या अन्य मान्यवर नेत्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रार्थना केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव व अन्य नेत्यांनी दिल्लीतील झंडेवालन मंदिरात प्रार्थना केली. तसेच हरदीप सिंग पुरी यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा शहरातील विविध भागात टीव्हीवर लाइव्ह पाहिला.

logo
marathi.freepressjournal.in