उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील सिलक्यारा बोगद्याच काम सुरु असताना अचानक पणे बोगदा कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात ४१ कामगार अडकले. या घटनेला आता १४ दिवस झाले आहेत. या कामागारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. यासाठी खास विदेशातून बोगदा तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स यांना पाचारण करण्यात आलं आहे. त्यांनी चार दिवसांत या कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं होतं. मात्र आता हे कामगार ख्रिसमसपर्यंत आपल्या घरी परततील असं त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आर्नोल्ड डिक्स?
बोगदा दुर्घटनेत अडकुन पडलेल्या ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी खास विदेशातून बोगदा तज्ज्ञ आर्नोल्ड डिक्स यांना बोलवण्यात आलं आहे. त्यांना आता पत्राकारांशी भाष्य करत कामगार कधी सुखरुप बाहेर येतील याबाबत माहिती दिली आहे. ऑगर मशीन यापुढे काम करण्यात सक्षम नसल्यानं साईटवरील ड्रिलिंग आणि ऑजरिंग ऑपरेशन्स बंद करण्यात आली आहेत. आम्ही इतर अनेक पर्याय शोधत आहोत, या प्रत्येक प्रयत्नावेळी आम्ही अडकलेले सर्वजण सुखरुप घरी कसे येतील याचा विचार करत आहोत. सध्या ते सर्वजण सुरक्षित आहेत.
ते पुढे बोलताना म्हणाले, इथल्या पर्वताच्या कठीण दगडानं पुन्हा एकदा औगरला विरोध केला आहे. म्हणून आम्ही आमच्या कामाचा पुनर्विचार करत आहोत. मला खात्री आहे की हे अडकलेले ४१ कामगार ख्रिसमसपर्यंत घरी येथील. यावेळी अमेरिकन ऑगर मशीन पूर्णपणे बिघडली असून ती आता दुरुस्त करण्यायोग्य नसल्याचंही ते म्हणाले.