१२१ जागा, १३१४ उमेदवार; बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

बिहारमध्ये २४३ जागांसाठी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. १२१ जागांवर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान | प्रातिनिधिक छायाचित्र
बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान | प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पाटणा : बिहारमध्ये २४३ जागांसाठी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी मतदान होणार असून १३१४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १२२ जागांसाठी ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

१८ जिल्ह्यांत १२१ जागांसाठी मतदान

मधेपुरा, सहरसा, दरभंगा, मुझफ्फरपूर, गोपालगंज, सिवान, सारण, वैशाली, समस्तीपूर, बेगुसराय, खगरिया, मुंगेर, लखीसराय, शेखपुरा, नालंदा, पाटणा, भोजपूर आणि बक्सर या जिल्ह्यांतील १२१ जागांवर मतदान होणार आहे.

पहिल्या टप्प्यात एकूण ३ कोटी ७५ लाख १३ हजार ३०० मतदार असून त्यात ७५८ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील २,१३५ मतदान केंद्रांवर मतदानाची वेळ एक तासाने कमी करण्यात आली आहे. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. ही मतदान केंद्रे संवेदनशील असून, मुख्यालयापासून दूर अंतरावर असलेल्या केंद्रांसाठी ही व्यवस्था आहे.

logo
marathi.freepressjournal.in