Bihar Boat Capsizes : मुजफ्फरपूरमध्ये ३४ विद्यार्थी वाहून नेणारी नाव उलटली ; 18 विद्यार्थी बेपत्ता, शोध सुरु

Bihar Boat Capsizes : मुजफ्फरपूरमध्ये ३४ विद्यार्थी वाहून नेणारी नाव उलटली ; 18 विद्यार्थी बेपत्ता, शोध सुरु

एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील घटनास्थळी बचाव पथक पोहचण्यास एका तासापेक्षा जास्त वेळ लागल्याने मुजफ्फरपूरमधील नागिकांनी संताप व्यक्त केला आहे.

बिहारच्या(Bihar) मुजफ्फरपूरमध्ये आज (१४ सप्टेंबर) एक मोठी दुर्घटना घडली आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरलेली नाव (Boat) बागमती नदीत उलटून अपघात झाला. या नावेत ३४ विद्यार्थी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यापैकी १८ विद्यार्थी अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एवढी मोठी दुर्घटना होऊन देखील घटनास्थळी बचाव पथक पोहचण्यास एका तासापेक्षा जास्त वेळ लागला. यामुळे बिहारच्या प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. बचाव पथक वेळेवर न पोहचल्याने मुजफ्फरपूरमधील नागिकांनी संताप व्यक्त केला. सध्या एडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखळ झालं असून बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे.

गुरुवारी सकाळी बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये एक नाव विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. या नावेत ३४ विद्यार्थी होते. बागमती नदीतून जात असताना अचनाक नाव डळमळू लागली. यानंतर काही अंतर पार केल्यावर ही नाव उलटली. आज सकाली साडेदहा ते अकारा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या फथकांनी अपघातस्थळी धाव घेतली, मुजफ्फरनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

अपघात ग्रस्तांना मदत देणार - मुख्यमंत्री नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घनेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी या दुर्घटनेची चौकशी करत असून या अपघातात बाधित कुटुंबांना सरकारकडून मदत दिली जाईल, असं आश्वास त्यांनी दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in