बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार

बिहारमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 'रालोआ'चे जागावाटप निश्चित झाल्याचे समजते. जदयू १०२, भाजप १०१ जागा, चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी (रामविलास) यांना २०, जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी १० जागा देण्यात आल्या आहेत.
बिहारमध्ये जदयू १०२, भाजप १०१ जागा लढणार
Published on

पाटणा : बिहारमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी 'रालोआ'चे जागावाटप निश्चित झाल्याचे समजते. जदयू १०२, भाजप १०१ जागा, चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी (रामविलास) यांना २०, जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी १० जागा देण्यात आल्या आहेत.

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) कंबर कसली आहे. 'रालोआ'त पाच पक्ष आहेत. भाजप आणि जदयूव्यतिरिक्त चिराग पासवान यांचा पक्ष, जीतनराम मांझी यांचा पक्ष आणि उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष आदींचा 'रालोआ'त समावेश आहे. या पाच पक्षांमध्ये जागांचे वाटप अंतिम झाले आहे.

बिहारमधील २४३ जागांपैकी सर्वाधिक जागांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष जदयू लढणार आहे. जदयूला १०२ जागा, दुसऱ्या क्रमांकावरील भाजपा १०१ जागा, चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपी (रामविलास) यांना २० जागा मिळाल्या आहेत. याशिवाय जीतनराम मांझी आणि उपेंद्र कुशवाहा यांना प्रत्येकी १० जागा देण्यात आल्या आहेत. एक-दोन जागा पुढेमागे होऊ शकतात.

तथापि, या आकड्यांबाबत अद्याप अधिकृतरीत्या पुष्टी करण्यात आलेली नाही. जागावाटपाबाबत लवकरच घोषणा होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in