SIR मधून ६९ लाख नावे हटवली; बिहारमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर

देशात गाजलेल्या बिहारच्या मतदार यादी सखोल पुनर्विलोकलन (एसआयआर) ची अंतिम यादी मंगळवारी जाहीर झाली. बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी आहे. अंतिम यादीतून ६९.२९ लाख नावे रद्द केली असून २१.५३ लाख नावे जोडली गेली आहेत.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

पाटणा : देशात गाजलेल्या बिहारच्या मतदार यादी सखोल पुनर्विलोकलन (एसआयआर) ची अंतिम यादी मंगळवारी जाहीर झाली. बिहारमध्ये एकूण मतदारांची संख्या ७.४२ कोटी आहे. अंतिम यादीतून ६९.२९ लाख नावे रद्द केली असून २१.५३ लाख नावे जोडली गेली आहेत.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व दावे आणि हरकतींचा विचार करून, विशेष सखोल पुनर्विलोकलन (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत तयार करण्यात आलेली "अंतिम मतदार यादी" निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केली.

विशेष सखोल पुनर्विलोकलनाच्या पार्श्वभूमीवर, अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मसुदा मतदार यादीत ७.२४ कोटी नावे होती, तर सुमारे ६५ लाख ‘अनुपस्थित’, ‘स्थलांतरित’ किंवा ‘मृत’ मतदारांची नावे वगळण्यात आली होती.

मात्र, पटणा जिल्हा प्रशासनाने जाहीर केले की त्यांच्या कार्यक्षेत्रातील १४ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदारांची संख्या ४८.१५ लाख आहे. जी १ ऑगस्टला प्रकाशित झालेल्या मसुदा मतदार यादीपेक्षा १.६३ लाखांनी जास्त आहे.

जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या २२.७५ लाख आहे, तर दिघा मतदारसंघात सर्वाधिक ४.५६ लाख मतदारांची नोंद आहे.

बिहार विधानसभा निवडणुकांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशभरात अमलात आणण्याची निवडणूक आयोगाची योजना असलेला हा प्रचंड एसआयआर उपक्रम वादग्रस्त ठरला आहे.

विरोधी पक्षांनी, आरोप केला आहे की, एसआयआरच्या माध्यमातून सत्ताधारी भाजप-आघाडीला मतदान न करणाऱ्या मतदारांची नावे चुकीने वगळली जात आहेत.

मात्र, भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी ठाम भूमिका घेतली आहे की, एसआयआर आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in