बिहारमध्ये दोन माथेफिरूंमध्ये गोळीबार;एक ठार,नऊ जखमी

गोळीबाराच्या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिहारमध्ये दोन माथेफिरूंमध्ये गोळीबार;एक ठार,नऊ जखमी
Published on

चित्रपटात शोभेल अशी घटना बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यात घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन माथेफिरू हल्लेखोरांनी महामार्गावर सुमारे ३० किमीपर्यंत पिस्तुलाने गोळीबार केला. यात गोळी लागल्याने एका व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाला. बाचवारा, फुलवारिया, बरौनी आणि चकिया भागात झालेल्या या घटनेत नऊ जखमी झाले आहेत. सर्वांना रुग्णालयात दाखल केले आहे.

गोळीबाराच्या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक जीव वाचवत इकडे-तिकडे धावू लागले होते. तर दुचाकीस्वार शस्त्रे उगारत गोळीबार करत होते. लोक त्यांना ‘सायको किलर’ म्हणत आहेत. गोळीबार करत गुन्हेगार समस्तीपूरच्या दिशेने पळून गेले. चंदन कुमार असे मृताचे नाव असून, तो बरौनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपरा गावातील रहिवासी आहे. तर जखमींमध्ये पटना येथील बरह येथील रहिवासी विशाल सोलंकी, मोकामा येथील रहिवासी रणजित यादव, फुलवारिया, बेगूसराय येथील रहिवासी नितेशकुमार, तेय येथील गौतमकुमार, बरौनी येथील अमरजीत कुमार, मन्सूरचक येथील नितीशकुमार, मरांचीचे मोहन राजा, प्रशांतकुमार राजक शिवाय आणि भरत यादव यांचा समावेश आहे. या घटनेनंतर बेगूसराय शहर सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत रुग्णवाहिकेच्या सायरनने दणाणले होते.

logo
marathi.freepressjournal.in