बिहारमध्ये रिक्षा-ट्रक टक्कर; ८ ठार, ५ जण गंभीर जखमी

पाटणामध्ये शनिवारी (दि. २४) सकाळी रिक्षा आणि ट्रक यांची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.
बिहारमध्ये रिक्षा-ट्रक टक्कर; ८ ठार, ५ जण गंभीर जखमी
Photo : X
Published on

पाटणा : पाटणामध्ये शनिवारी (दि. २४) सकाळी रिक्षा आणि ट्रक यांची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतामध्ये सात महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रिक्षामधील सर्वजण गंगा स्नान करण्यासाठी निघाले होते, त्यावेळी काळाने घाला घातला. ट्रकने रिक्षाला जोरात धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अपघातानंतर महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूककोंडी सुरळीत केली. त्याशिवाय जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी आठ मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.

पाटणामधील शाहजहांपूर येथे रिक्षा आणि ट्रकचा हा भयंकर अपघात झाला. या भयंकर अपघातामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in