IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे ‘सिंघम’ आयपीएस शिवदीप लांडे यांचा राजीनामा
X/@vijayholamMT

IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे ‘सिंघम’ आयपीएस शिवदीप लांडे यांचा राजीनामा

शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने बिहारसह महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात चर्चेला पेव फुटले आहे.
Published on

बिहार : बिहारचे ‘सिंघम’ अशी ओळख असलेले मराठमोळे ‘आयपीएस’ अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे. शिवदीप लांडे यांनी अचानक राजीनामा दिल्याने बिहारसह महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात चर्चेला पेव फुटले आहे.

शिवदीप लांडे यांनी स्वत: याबाबतची माहिती आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. शिवदीप लांडे यांनी जवळपास १८ वर्षे पोलीस खात्यात सेवा केली आहे. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांनी अचानक राजीनामा का दिला? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. शिवदीप लांडे यांनी राजीनामा पत्र पोलीस मुख्यालयाला पाठवले असले तरी त्यांचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी पूर्णियाच्या ‘आयजी’ पदाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आहे. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवल्याने ते नाराज होते, अशी चर्चा आहे.

logo
marathi.freepressjournal.in