बिहारमध्ये मतदार यादीतून ३५ लाख नावे हटवणार; EC चा निर्णय, राजकीय संघर्ष पेटणार

निवडणूक आयोगाने बिहारच्या मतदार यादीतून सखोल पुनर्विलोकलन केल्यानंतर ३५ लाख मतदारांची नावे हटवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
बिहारमध्ये मतदार यादीतून ३५ लाख नावे हटवणार; EC चा निर्णय, राजकीय संघर्ष पेटणार
Published on

पाटणा : निवडणूक आयोगाने बिहारच्या मतदार यादीतून सखोल पुनर्विलोकलन केल्यानंतर ३५ लाख मतदारांची नावे हटवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

आयोगाने सांगितले की, राज्यातील बहुतांशी मतदारांशी थेट संपर्क करून त्यांच्याकडे ‘ईएफ’ फॉर्म पाठवला आहे. ८८.६६ टक्के मतदारांनी आपला फॉर्म जमा केला आहे. या प्रक्रियेनंतर ३५ लाखाहून अधिक मतदारांचे नाव मतदार यादीतून बाहेर काढले जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बिहारच्या ६.६ कोटी मतदारांनी आपला फॉर्म जमा केला आहे. हे प्रमाण राज्याच्या एकूण मतदारांच्या ८८.१८ टक्के आहे. मतदारांना आपला फॉर्म जमा करण्याची तारीख २५ जुलै आहे. त्यानंतर मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, आतापर्यंत मतदार यादीतील १२.५ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. तरीही त्यांचे नाव मतदार यादीत आहेत. तर १७.५ लाख मतदार कायमस्वरुपी बिहारच्या बाहेर गेले आहेत. आता ते राज्यात मतदान करू शकत नाहीत. तर ५.५ लाख मतदारांची यादीत दोनदा नावे आहे. त्यामुळे ३५.५ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून हटणार आहेत.

बिहारमधील मतदार यादीत नेपाळ, बांगलादेश आणि मान्यमार येथील काही परदेशी नागरिकांची नावे आढळली. त्यानंतर ही नावे हटवण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in