बिजापूर चकमकीत ४० लाखांचे इनाम असलेला नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफने नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानादरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

बिजापूर : गेल्या काही दिवसांपासून नक्षलवाद्यांविरोधात हाती घेण्यात आलेल्या व्यापक मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांच्या हाती मोठे यश मिळाले आहे. छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात डीआरजी आणि एसटीएफने नॅशनल पार्क परिसरात नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानामध्ये नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर हा मारला गेल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर ४० लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

छत्तीसगडमधीस बिजापूर जिल्ह्यात नॅशनल पार्क परिसरात डीआरजी आणि एसटीएफने नक्षलवाद्यांविरोधात चालवलेल्या संयुक्त अभियानादरम्यान, नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी इतर नक्षलवाद्यांसह नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला सुधाकर यालाही घेरले. या चकमकीत तो मारला गेला. सुधाकरवर सरकारने ४० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले होते. ही चकमक बिजापूरमधील घनदाट जंगलामध्ये झाली.

logo
marathi.freepressjournal.in