नूह हिंसाचाराला कारणीभूत आरोपी बिट्टू बजरंगीला अटक ; सोशल मीडियावर केल्या होत्या प्रक्षोभक पोस्ट

नूह येथे झालेल्या हिंसाचाराच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात...
नूह हिंसाचाराला कारणीभूत आरोपी बिट्टू बजरंगीला अटक ; सोशल मीडियावर केल्या होत्या प्रक्षोभक पोस्ट

हरियाणातील नूह हिंसाचाराचा आरोपी बिट्टू बजरंगीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या फरिदाबाद येथील घरातून त्याला अटक करण्यात आली आहे. हिंसाराचर प्रकरणाचा तपास केल्यानंतर बिट्टू बजरंगीला अटक करण्यात आली. हरियाणातील नूह येथे सुरु झालेल्या हिंसाचाराची धग ही गुरुग्राम आणि शेजाच्या जिल्ह्यांना देखील बसली. बिट्टू बजरंगी हा या घटनेचा मुख्य आरोपी होता.

बृजमंडल शोभायात्रेपूर्वी बिट्टू बजरंगीने सोशल मीडियावर अनेक प्रक्षोभक पोस्ट केल्या होत्या. यात त्याने मुस्लिम समुदायाला चिथावणी देताना म्हटलं होते की, मी सासरवाडीला येत आहे....जावयाचं स्वागत नाही करणार काय़? फरिदाबाद पोलिसांनी बिट्टू बजरंगीला या आधी देखील अटक केली होती.

नूह येथे झालेल्या हिंसाचाराच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. यात बिट्टू बजरंगीने म्हटलं होतं की, हे सांगू नका की आधी सांगितलं नाही... आम्ही सासरवाडीला आलो..अन् आपली भेट नाही. फुल पुष्पहार तयार ठेवा...तुमचे दाजी भेटण्यासाठी येत आहे.. १५० गाड्यांचा ताफा आहे. याप्रकरणी नूह पोलिसांनी बिट्टू बजरंगीला अटक केली असून त्याच्याविरोधात नूह पोलिसांत विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरुन बिट्टू बजरंगीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

नूह हिंसाचार प्रकरण

हरियाणातील नूह येथे हिंदू संघटनांनी दरवर्षीप्रमाणे ३१ जुलै रोजी बृजमंडल यात्रा काढण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने या यात्रेला परवानगी देखील दिली होती. मात्र, या यात्रेवर अचानक दगडफेक करण्यात आली. यानंतर काही वेळातच दोन समुदायांमध्ये हिंसाचार सुरु झाला. यात शेकडो गाड्या पेटवण्यात आल्या. तसंच सायबर पोलीस स्टेशनवरही यावेळी हल्ला झाला. तर काहीठिकाणी गोळीबारीच्या घटना देखील घडल्या. नूहनंतर सोहना या ठिकाणी देखील दगडफेक आणि गोळीबार झाला. यानंतर या हिंसाचाराची आग नूहपासून फरीदाबाद-गुरुग्रामपर्यंत पसरत गेली.

logo
marathi.freepressjournal.in