राहुल गांधी यांना धक्काबुक्की; भारत जोडो यात्रेत भाजपचे कायकर्ते घुसले

न्याय यात्रेच्या ताफ्यावर गेल्या ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
राहुल गांधी यांना धक्काबुक्की; भारत जोडो यात्रेत भाजपचे कायकर्ते घुसले

सोनितपूर : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत भाजप कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन शिरले. बसमध्ये राहुल गांधींना पाहताच त्यांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ बसमध्ये नेऊन बसवले.

राहुल यांनी सांगितले की, भाजपचे काही कार्यकर्ते झेंडा घेऊन आमच्या बससमोर आले. मी बसमधून बाहेर पडलो तेव्हा ते पळून गेले. आमचे जितके पोस्टर्स फाडायचे असतील तर फाडून टाका. आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमची लढाई विचारधारेची आहे. आम्ही नरेंद्र मोदी, हिमंत बिस्व सर्मा यांच्यासह कोणाच घाबरत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

न्याय यात्रेच्या ताफ्यावर गेल्या ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आमचा ताफा आसाममधील रॅलीच्या स्थळाकडे निघाला होता. तेव्हा जुमगुरीहाट येथे हिमंता बिस्वा सर्मा यांच्या गुंडांनी सरचिटणीस जयराम रमेश यांच्या गाडीवर पाणी फेकून मारले व स्टीकर्स फाडले. काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत भाजप कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन शिरले. बसमध्ये राहुल गांधींना पाहताच त्यांनी जय श्रीराम आणि मोदी-मोदीच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना तत्काळ बसमध्ये नेऊन बसवले.

राहुल यांनी सांगितले की, भाजपचे काही कार्यकर्ते झेंडा घेऊन आमच्या बससमोर आले. मी बसमधून बाहेर पडलो तेव्हा ते पळून गेले. आमचे जितके पोस्टर्स फाडायचे असतील तर फाडून टाका. आम्हाला काहीच फरक पडत नाही. आमची लढाई विचारधारेची आहे. आम्ही नरेंद्र मोदी, हिमंत बिस्व सर्मा यांच्यासह कोणाच घाबरत नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

न्याय यात्रेच्या ताफ्यावर गेल्या ४८ तासांत दुसऱ्यांदा हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. आमचा ताफा आसाममधील रॅलीच्या स्थळाकडे निघाला होता. तेव्हा जुमगुरीहाट येथे हिमंता बिस्वा सर्मा यांच्या गुंडांनी सरचिटणीस जयराम रमेश यांच्या गाडीवर पाणी फेकून मारले व स्टीकर्स फाडले.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, भाजपच्या लोकांनी आमच्या सोशल मीडिया टीमचे कॅमेरामन व अन्य सदस्यांवर हल्ला केला. ज्यात दोन महिला होत्या. हिमंता यांनी हे भ्याड हल्ले करणे सोडावे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला तुम्ही किंवा तुमचे गुंड रोखू शकत नाही. यापूर्वी १९ जानेवारीच्या रात्री काँग्रेसने न्याय यात्रेच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप भाजपवर लावला होता. ज्यात काही गाड्यांच्या काचा तुटल्या होत्या, तर काही जण पक्षाचे होर्डिंग-बॅनर उखडत होते.

या घटनेनंतर सोनितपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक मधुरिमा दास म्हणाल्या की, काँग्रेसच्या ताफ्यावर काहींनी हल्ला केला असे आम्ही ऐकून आहोत. त्या प्रकरणी आम्ही चौकशी करत आहोत. शनिवारी खासदार जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सर्मा यांच्यावर टीका केली होती. आसामचे भाजपचे सरकार आमच्या यात्रेमध्ये अडचणी निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतेच ज्या मार्गाने गुवाहाटीला प्रवास केला होता, त्या मार्गावरून आमचीही यात्रा शांतपणे जाऊ द्यावी”, अशी मागणी जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत केली.

logo
marathi.freepressjournal.in