दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभिकरणावर ४५ कोटींचा खर्च? भाजपचा दावा

भाजपने आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या सुशोभिकरणावर ४५ कोटींचा खर्च करण्यात आला
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांच्या निवासस्थानी सुशोभिकरणावर ४५ कोटींचा खर्च? भाजपचा दावा

सध्या आम आदमी पक्षाचे नेते भाजपच्या चांगलेच निशाण्यावर आहेत. मनीष सिसोदिया यांच्यानंतर आता भाजपने आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे. भाजपने आरोप केला आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी सुशोभिकरणासाठी तब्बल ४५ कोटींचा खर्च करण्यात आला आहे. यामुळे सध्या दिल्लीचे राजकारण चांगलेच तापले आहे.

कोरोना काळात म्हणजे सप्टेंबर २०२० ते जून २०२२ या कालावधीत दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासावर ४५ कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप भाजपने केला. ६ टप्प्यांमध्ये ही रक्कम खर्च केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. हा आरोप करताना भाजपने पीडब्ल्युडीमधील काही कागदपत्रांचा हवाला दिला. यावर 'आप'ने स्पष्टीकरण दिले आहे की, "ही रक्कम फक्त सुशोभिकरणासाठीच नव्हे, तर त्याठिकाणी नव्या बांधकामासाठीही वापरली गेली. त्यांचे कार्यालयही याच भागामध्ये उभारले आहे." एवढेच नव्हे तर 'आप'ने पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुशोभिकरणासाठी नियमित बजेटपेक्षा तिप्पट म्हणजेच ९० कोटी रुपये खर्च झाल्याचा आरोप केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in